Monday, 4 October 2021

चंद्र (Moon)

 

चंद्र (Moon)


    पृथ्वीवरुन रात्रीच्या आकाशात उघड्या डोळ्यांनी पाहता येणारी खगोलीय वस्तु म्हणजेच चंद्र होय. चंद्र हा आपल्याला रात्रीच्या अंधारात दिसतो खरा पण चंद्राला स्वताचा प्रकाश नाही. सुर्याकडुन मिळणारा प्रकाश चंद्र पृथ्वीकडे परावर्तित करतो, त्यामुळे चंद्र आपल्याला प्रकाशमान दिसतो. चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे. चंद्र हा प्लूटो ग्रहापेक्षा देखिल मोठा आहे. चंद्रावर वातावरण देखिल आढळते. तेथील तापमानात प्रचंड बदल झालेले आढळतात. चंद्राच्या सूर्याकडील बाजुचे तापमान हे दिवसा 134°c तर रात्रीच्या वेळी -153°c इतके थंड असते. चंद्राला पृथ्वीभोवती फिरण्यासाठी 27.3 दिवस लागतात.


      चंद्राचे पृथ्वीपासुन सरासरी अंतर हे 3,84,400 किमी इतके आहे. चंद्राचे पृथ्वीपासून सर्वात जवळचे अंतर 3,63,300 किमी तर सर्वात दूरचे अंतर 4,05,500 किमी इतके आहे. चंद्राची गुरुत्वाकर्षन शक्ती पृथ्वीला आपल्याकडे खेचते त्यामुळेच पृथ्वीवरील समुद्र पातळीत वाढ होते. म्हणजेच भरती ओहोटी येते. चंद्र त्याच्या गुरूत्वाकर्षण शक्तीने पृथ्वीला आपल्या कडे खेचतो त्याचा हा प्रभाव आहे. तसेच यामुळे पृथ्वीवरील दिवसात दर 100 वर्षांनी 2.3 मिली सेकंदानी वाढ होते.

      चंद्राच्या संबंधीत दोन महत्वाच्या घटना म्हणजे अमावस्या आणि पौर्णिमा.

अमावस्या

    अमावस्येला सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र येतो परंतु हे तिघे एका रेषेत नसतात. सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतो परंतु तिथून परावर्तित झालेला प्रकाश हा पृथ्वीवरील अंधाऱ्या भागात पोहचत नाही. परिणामी रात्रीच्या वेळी आकाशात पूर्ण अंधार असतो.


        पौर्णिमा

     

      पौर्णिमेला सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी येते. यावेळेस देखील सूर्य, पृथ्वी, चंद्र एका रेषेत नसतात. सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतो, आणि चंद्रावरील परावर्तित झालेला प्रकाश पृथ्वीवरील अंधाऱ्या भागात येतो.








Tuesday, 3 August 2021

प्लूटो (Pluto)

 

प्लूटो (Pluto)

      आपल्या सूर्यमालेतील सर्वांत शेवटचा ग्रह म्हणजेच प्लूटो ग्रह. या ग्रहाला सूर्यापासून शेवटचा ग्रह म्हणून ओळखले जाते. परंतु आता तो बटु ग्रह म्हणून ओळखला जातो. 2006 मध्ये प्लूटो ग्रहाला बटु ग्रह म्हणून घोषित करण्यात आला. कारण की प्लूटो या ग्रहाची कक्षा नेपच्यूनच्या कक्षेला छेद देऊन जातो. इतर ग्रह मात्र आपआपल्या कक्षेत ‍फिरतात. यामुळे प्लूटोचे ग्रहपद आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघटनेने काढून टाकले.

      अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ Percival Lowell यांनी प्रथम 1905 मध्ये युरेनस आणि नेपच्यून या ग्रहांमध्ये काही हलचाल पाहिली आणि 1915 मध्ये तेथे ग्रह असण्याचे भाकित केले. परंतु त्यानंतर त्यांचा मृत्यु झाला. त्यानंतर 1930 साली Clyde Tombaugh यांनी Lowell आणि आणखी काही खगोल शास्त्रज्ञांच्या भाकितावरून प्लूटो ग्रहाचा शोध लावला.

      प्लूटो ग्रहाचे सूर्यापासूनचे सरासरी अंतर हे 5,906,380,000 km इतके आहे. हे अंतर पृथ्वीच्या 39.482 पट आहे. या ग्रहाचा व्यास हा 2370 km इतका आहे. प्लूटो ग्रहाला स्वता भोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी सहा दिवस लागतात तर सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी तब्बल 248 वर्षे लागतात. म्हणजेच काय तर प्लूटो या ग्रहावरील एक वर्ष म्हणजे आपल्या पृथ्वीवरील 248 वर्षे होय.

      प्लूटो या ग्रहावर नायट्रोजन(N2), मिथेन(CH4), कार्बन मोनॉक्साईड(CO) इत्यादी वायु आढळतात. याग्रहाचा 70% भाग हा खडकापासुन बनलेला असून याग्रहावर 2 ते 3 km उंचीचे डोंगर, पर्वत आढतात. हे पर्वत काही वेळा गोठलेल्या मिथेन वायुन झाकलेले दिसतात. येथील तापमान हे -226°c ते -240°c इतके कमी आहे. शेरॉन(Charon), स्टीक्स(Styx), निक्स(Nix), कर्बेरॉस(Kerberos), हायड्रा(Hydra) इत्यादी पाच उपग्रह आहेत. या मधील शेरॉन हा सर्वात मोठा उपग्रह आहे. जुलै 2015 मध्ये नासा या संस्थेच्या न्यू हॉरिझन या अवकाशयानाने प्लूटो या ग्रहाला भेट दिली. 2006 साली हे यान सोडण्यात आले होते.

Wednesday, 14 April 2021

नेपच्यून (Neptune)

 

नेपच्यून (Neptune)

       आता आपण सुर्यापासून सर्वात दूरच्या ग्रहाची म्हणजेच नेपच्यून या ग्रहाची माहिती पाहुयात. या ग्रहाचे सुर्यापासूनचे अंतर हे 4,498,396,000 किलोमीटर इतके आहे. इतके जास्त अंतर असल्यामुळे नेपच्यून ग्रहाला सुर्याभोवती एक फेरी मारण्यासाठी 164 वर्षे लागतात. तर नेपच्यून वरील दिवस मात्र फक्त 16 तास 7 मिनिटांचा असतो. म्हणजेच स्वत:भोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी त्याला 16 तास 7 मिनिटे इतका वेळ लागतो. अशा या नेपच्यून ग्रहाचे 14 चंद्र ज्ञात आहेत.


       नेपच्यून हा ग्रह गॅस आणि बर्फाचा गोळा आहे. या ग्रहाची गुरूत्वाकर्षण शक्ती ही पृथ्वीच्या गुरूत्वाकर्षण शक्ती ही पृथ्वीच्या गुरूत्वाकर्षण शक्तीपेक्षा 17% जास्त मजबुत आहे. या ग्रहावरील वाऱ्यांचा वेग हा सरासरी 2100 किलोमीटर प्रति तास इतका आहे. आतापर्यंत फक्त एकाच अंतराळयानाने या ग्रहाला भेट दिली आहे. 25 ऑगस्ट 1989 रोजी Voyager 2  या यानाने ग्रहाच्या उत्तर ध्रुवापासुन 3000 किलोमीटर इतक्या जवळून गेले.

       नेपच्यून ग्रहाचे वजन 1.02 x 1026 किलोग्रॅम इतके आहे. या ग्रहावर हायड्रोजेन, हेलियम, मिथेन हे गॅस आढळतात. मिथेन गॅसमुळेच या ग्रहाचा रंग हा निळसर दिसतो.








Sunday, 4 April 2021

युरेनस (Uranus)

 


    ............चला तर आज आपण आज सूर्यापासुन सातव्या क्रमांकाच्या ग्रहाविषयी म्हणजेच युरेनस(Uranus) विषयी माहिती घेऊया. दुर्बिनीच्या सहाय्याने शोधलेला पहिला ग्रह म्हणजे युरेनस होय. युरेनस या ग्रहाचे सूर्यापासुनचे अंतर तब्बल 288 कोटी किलामीटर इतके आहे. युरेनस या ग्रहावरील‍ दिवस हा फक्त 17 तासांचाच असतो. तर या ग्रहावरील एक वर्ष हे पृथ्वीवरील 84 वर्षांइतके असते. म्हणजेच काय तर सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी युरेनस ग्रहाला 84 वर्षे लागतात.

       युरेनस ग्रहाला 27 चंद्र आहेत. चंद्र म्हणजे नैसर्गिक उपग्रह होय. युरेनस हा ग्रह उघड्या डोळ्यांनी दिसत नाही. युरेनस ग्रह हा सर्वांत थंड ग्रह आहे. सुर्यापासुन खूप दुर असल्यामुळे तो गोठलेल्या अवस्थेत आहे. युरेनस वरील कमीत कमी तापमान -224˚c इतके आहे. त्याच्या वातावरणात हायड्रोजन, हेलियम, आमोनिया व मिथेन इत्यादी वायु आढळतात. मिथेन वायुमुळे हा ग्रह निळसर रंगाचा दिसतो. या ग्रहावरील वाऱ्यांचा वेग हा सरासरी 900 किलोमीटर प्रती तास इतका प्रचंड आहे. युरेनस या ग्रहाचे वजन हे पृथ्वीच्या वजनाच्या 14.5 पट आहे.



Voyager 2  हे अंतराळयान ऑगस्ट 1977 मध्ये सोडण्यात आले होते तर ते 24 जानेवारी 1986 रोजी युरेनस जवळ पोहोचले म्हणजे जवळ जवळ 8 वर्षे. असा हा आपल्या सूर्यमालेतील सातव्या क्रमांकाचा ग्रह आहे.





................

      







Sunday, 6 December 2020

शनी (Saturn)

 


………… आज आपण शनी (Saturn) या ग्रहाविषयी माहिती पाहुया. हा ग्रह आपल्या सूर्यमालेतील सहाव्या क्रमांकाचा ग्रह आहे, आणि दुसरा सर्वांत मोठा ग्रह आहे. हा ग्रह सर्वप्रथम इटालियन शास्त्रज्ञ गॅलिलीओ यांनी 1610 मध्ये आपल्या दुर्बिणीच्या माध्यमातुन पाहिला. शनी हा ग्रह हायड्रोजन आणि हेलियम या वायुंपासुन बनलेला आहे. या ग्रहाचे वस्तुमान (mass)  हे पृथ्वीच्या वस्तुमानाच्या 95 पट आहे.


       शनी या ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर हे 143 कोटी किलोमीटर इतके आहे. शनी हा ग्रह आपल्याला उघड्या डोळ्यांनी देखील दिसतो. परंतु त्याची कडा, वलय (ring) पाहण्यासाठी मात्र आपल्याला दुर्बिणीची आवश्यकता भासते. शनी या ग्रहाला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी तब्बल 29 वर्षे लागतात. पृथ्वीवरील वर्ष हे 365 दिवसांचे असते तर शनी ग्रहावरचे वर्ष 10,759 दिवसांचे असते. शनी ग्रहावरील दिवस 10 तासा 39 मिनिटांचा असतो.



       शनी या ग्रहावर वाऱ्यांचा वेग हा 1800 किलोमिटर प्रती तास इतका असतो. शनी ग्रहाची घनता ही पृथ्वीवरील पाण्याच्या घनतेपेक्षा कमी असल्यामुळे हा ग्रह जर पाण्यात टाकला तर तो पाण्यावर तरंगेल अर्थातच हे शक्य नाही परंतु कल्पणा करुन पहा. अशाच प्रकारे आपल्याला जर गाडीने (car) 117 किलोमिटर प्रती तास वेगाने जायचे असेल तर आपल्याला 1292 वर्षे लागतील.



       शनी ग्रहावरील वातावरणाचा दाब हा पृथ्वीवरील वातावरणाच्या दाबाच्या 100 पट अधिक आहे. शनी ग्रहाला सर्वप्रथम पायोनिअर 11 हे अंतराळयान 1993 साली सोडण्यात आले. त्यानंतर व्हॅायोजर 1 आणि 2 सोडण्यात आले. त्यानंतर 1997 साली कॅसीनी हे यान सोडन्यात आले आणि 2004 मध्ये ते शनी ग्रहाच्या कक्षेत पोहोचले.



Monday, 30 November 2020

गुरू (Jupiter)

……. चला तर आज आपण गुरू (Jupiter) ग्रहाविषयी माहिती पाहुया. गुरु ग्रहाचे सुर्यापासुनचे अंतर आहे तब्बल 778 लाख किलोमीटर. हा ग्रह सुर्याभोवती फिरताना एका तासाला 47,051 किमी अंतर पार करतो आणि स्वत:भोवती मात्र 9 तास 56 मिनिटांतच एक फेरी पुर्ण करतो. म्हणजेच गुरू ग्रहावरील एक दिवस हा केवळ 10 तासांचाच असतो. अशा या सर्वात वेगात फिरणाऱ्या ग्रहाला 79 नैसर्गिक उपग्रह लाभले आहेत. गुरू या ग्रहाचे वर्ष हे पृथ्वीवरील 4333 दिवसांचे असते. म्हणजेच 11 वर्षे. यामुळे गुरू ग्रहावर आपला वाढदिवस 11 वर्षांनी आला असता. 
                                          
        गुरू ग्रहाचे वस्तुमान हे सर्व ग्रहामध्ये जास्त आहे. गुरू हा ग्रह पृथ्वीच्या 318 पट मोठा आहे. ज्यामध्ये जवळपास 1300 पृथ्वी बसतील. आपल्या सूर्यमालेतील गुरू ग्रह वगळता सर्व ग्रहांच्या वस्तुमानाच्या बेरजेची दुप्पट केल्यास गुरू या ग्रहाच्या वस्तुमानाच्या बरोबर वस्तुमान होईल. गॅनीमेड हा गुरू या ग्रहाचा सर्वात मोठा उपग्रह आहे. त्याचा शोध इ.स. 1610 मध्ये खगोलशास्त्रज्ञ गॅलीलिओ गॅलेली यांनी शोध लावला. गॅनीमेड हा उपग्रह बुध ग्रहापेक्षा देखील मोठा आहे.

                                     


         गुरू या ग्रहाची चुंबकीय शक्ती देखील खुप जास्त आहे. हे पृथ्वीच्या चुबंकीय शक्ती पेक्षा 20 पट जास्त आहे. गुरू या ग्रहावर फक्त हेलियम आणि हायड्रोजन हे दोनच वायु आढळतात. यापासुनच हा ग्रह बनलेला आहे. थोडक्यात काय तर हा वायुचा गोळा आहे. गुरू या ग्रहावर तांबड्या रंगाचा जो डाग दिसतो ते तेथील एक वादळ आहे. या वादळातील केंद्रामधील वारे हे शांत असतात. परंतु बाहेरील बाजुच्या वाऱ्यांचा वेग हा 430 ते 680 किमी प्रती तास इतका असतो. पृथ्वीवरील सर्वांत जास्त वेगवान वादळाच्या दुपटी पेक्षाही हा वेग जास्त आहे. 2004 च्या सुरूवातीस या वादळाची रुंदी पृथ्वीच्या व्यासाच्या (Diameter) तीन पट जास्त म्हणजेच जवळपास 40,000 किमी इतकी होती. 
                                
                         


        गुरू या ग्रहावरील सरासरी तापमान हे -145˚c आहे. आतापर्यंत गुरू या ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी 9 उपग्रह पाठवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे सर्व उपग्रह नासा या अमेरिकेच्या संस्थेने पाठविलेली आहेत. त्यापैकी सर्वात पहिले पायोनिर - 10 हे होते. ते 3 मार्च 1972 साली पाठवण्यात आले. सर्वात आलीकडील उपग्रह हे Juno हे आहे. ते 5 ऑगस्ट 2011 रोजी पाठवण्यात आले. 5 जुलै 2016 रोजी या उपग्रहाने गुरूच्या कक्षेत प्रवेश केला. ……
                                        
                                   

                                     

Wednesday, 18 November 2020

मंगळ (Mars)



आज आपण मंगळ (Mars) या ग्रहाविषयी माहिती पाहुया. मंगळ ग्रहाचे अंतर सुर्यापासुन सुमारे 22.8 कोटी किलोमीटर आहे. सुर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला मंगळ ग्रहाला 1.88 वर्षे लागतात. या ग्रहावर आयर्न ऑक्साइड मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे हा ग्रहा आपल्याला तांबुस रंगाचा दिसतो. त्यामुळे या ग्रहाला लाल ग्रह (Red Planet) देखील म्हणतात. मंगळ ग्रहाला दोन उपग्रह आहेत. एक फोबोस तर दुसरा डिमोस. फोबोसचा व्यास आहे 22.2 किमी तर डिमोसचा व्यास आहे 12.6 किमी. पृथ्वीला ज्याप्रमाणे सुर्याभोवती फिरण्यासाठी 365 दिवस लागतात. त्याचप्रमाणे मंगळ ग्रहाला सुर्याभोवती एक फरी पुर्ण करण्यासाठी 687 दिवस लागतात.

पृथ्वीचे वस्तुमान हे मंगळ ग्रहाच्या सहा पट जास्त आहे. म्हणजेच आपल्या एका पृथ्वीमध्ये सहा मंगळ ग्रह बसतील. मंगळ ग्रहावर आपण पृथ्वीवर अनुभवत असलेल्या गुरूत्वाकर्षण शक्ती पेक्षा 62.5 % कमी गुरूत्वाकर्षण शक्ती अनुभवयास मिळते. म्हणजे मंगळ ग्रहावर पृथ्वीच्या तुलनेत 37.5% गुरूत्वाकर्षण शक्ती आहे. यामुळे आपण मंगळ ग्रहावर मारलेली उडी पृथ्वीवर मारलेल्या उडीच्या तुलनेत 3 पट जास्त असेल. मंगळ ग्रहावर असणाऱ्या वातावरणात तब्बल 96% प्रमाण हे कार्बनडायऑक्साइड चे आहे.

आतापर्यंत मंगळ ग्रहासाठी 39 योजना आखण्यात आल्या आहेत. परंतु त्यापैकी फक्त 16 च यशस्वी झाल्या आहेत. त्यातीलच भारताचे मिशन मंगळ हे एक आहे. 5 नोव्हेंबर 2013 रोजी आंध्रप्रदेश राज्यातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातुन प्रक्षेपीत करण्यात आले. सुमारे 25 दिवस हे यान पृथ्वीच्या कक्षेत स्थिरावले त्यानंतर 30 नोव्हेंबरला हे यान पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर पडले. 24 सप्टेंबर 2014 ला हे यान मंगळाच्या कक्षेत स्थिरावले.



India's mission Mangal



Thursday, 1 October 2020

पृथ्वी (Earth)

 

………..चला तर आज आपण आपल्या वस्तीस्थानाविषयी म्हणजेच आपल्या पृथ्वीविषयी माहिती घेऊया. सुर्यापासुन तिसऱ्या स्थानावर असणाऱ्या या ग्रहाचे सुर्यापासुनचे अंतर आहे 15 कोटी किलोमीटर ‼‼ आतापर्यंत तरी फक्त एवढ्याच ग्रहावर आपल्याला सजिवांचे अस्तित्व दिसुन येते.

       सुर्याभोवती एक फेरी पुर्ण करण्यासाठी पृथ्वीला 365 दिवस लागतात आणि स्वत:भोवती फिरण्यासाठी 24 तास लागतात. सूर्याभोवती फिरतांना पृथ्वी एका सेकंदात 30 किलोमीटर अंतर पार करते. म्हणजेच एका तासाला 1,08,000 किमी प्रवास करते. आपल्या पृथ्वीला एकच उपग्रह चंद्राच्या रुपाने भेटला आहे. अशी ही आपली पृथ्वी असा एकमेव ग्रह आहे की ज्याला देवाच्या नावावरुन नाव दिलेले नाही. आपला ग्रह हा 70% पाण्याने व्यापलेला आहे व उर्वरित जमिन आहे. पृथ्वीवर 3% पाणीच पिण्यायोग्य आहे. त्यातले 2% हे हिमनद्यामध्ये बर्फाच्या स्वरुपात आहे. उरलेला 1% हे पाणी पिण्यासाठी नद्या, तळे, धरणे यांमध्ये साठवले जाते. अशा या पृथ्वीभोवती सद्यस्थितीला 2,666 उपग्रह (satellite) कार्यरत आहेत.



Thursday, 10 September 2020

शुक्र (Venus)

 

विश्व पसारा भाग : 3


                                               

……… चला तर आता ग्रहमालेतील दुसऱ्या ग्रहाविषयी माहिती घेऊ; म्हणजेच शुक्र (Venus) ग्रहाविषयी.  शुक्र हा ग्रह जरी सुर्यापासुन दुसऱ्या नंबरवर असला तरी तो सर्वात उष्ण ग्रह आहे. शुक्र या ग्रहाबाबत मजेदार गोष्ट म्हणजे या ग्रहावर वर्षापेक्षा दिवस मोठा आहे. आपल्याला हे ऐकायला जरा विचित्रच वाटेल परंतु हे खरे आहे. शुक्र या ग्रहाला स्वत:भोवती चक्कर मारण्यास 244 दिवस लागतात तर शुक्र या ग्रहाला सुर्याभोवती एक पुर्ण चक्कर मारण्यासाठी 225 दिवस लागतात. शुक्र ग्रहावरील दिवस हा पृथ्वीवरील 244 दिवसांइतका असतो तर वर्ष हे पृथ्वीवरील 225 दिवसांइतके असते. बुध ग्रहाप्रमाणेच या ग्रहाला पण उपग्रह नाही.

     शुक्र या ग्रहावर पाऊस पडतो पण तो सल्फ्युरिक ॲसिडचा. शुक्रावरील वातावरणात कार्बनडायऑक्साइडचे प्रमाण 98% तर नायट्रोजन, अरगॉन, कार्बन मोनॉक्साईड या सर्व वायुंचे प्रमाण 2% आहे. शुक्र हा ग्रह आलल्याला सूर्यापासुन मिळनाऱ्या एकून उर्जेपैकी 70% उर्जा उस्तर्जित करतो. त्यामुळे हा ग्रह आपल्याला एखाद्या तेजस्वी ताऱ्याप्रमाणे दिसतो. शुक्र या ग्रहावरील हवेचा दाब हा पृथ्वीवरील दाबाच्या 90 पटीने जास्त आहे. समुद्राच्या तळाशी एक किलोमीटर खोल गेल्यानंतर जेवढा दाब असेल तेवढा ‼‼

      इतका प्रचंड दाब असतांना येथे व्हेनेरा – 13 (Venera – 13) हे यान सोडण्यात आले हे यान फक्त 23 मिनिटे कार्य करण्यासाठी पाठवण्यात आले होते. परंतु त्याचे शुक्रावरील आयुष्य हे 127 मिनिटांचे होते. या वेळेत त्याने शुक्रावरील रंगीत छायाचित्रे घेतले आणि त्यानंतर ते तेथील वातावारणाला बळी पडले. जगातिल अनेक संस्था या शुक्र ग्रहाचा अभ्यास करत आहेत आणि तेथील परिस्थितीला तोड देण्याच्या प्रयत्नात आहेत. …….

Venera 13

Saturday, 29 August 2020

सूर्य (Sun) - 2

 


       …………आत्मनिर्भर असलेला हा सूर्य आपल्या पृथ्वी पेक्षा 109 पटीने मोठा आहे. अशा या अवाढव्य सूर्याचे वजन देखील तसेच आहे. सूर्याचे वजन हे  आपल्या सूर्यमालेच्या वजनापैकी सुमारे 99.86 % वजन एकट्या सूर्याचे आहे आणि उरलेला 0.14 % हे सर्व ग्रहांचे. असा हा सूर्य फिरत असेल का ? तर या मध्ये शंका आहे. कारण सूर्य हा वायुपासुन बनलेला गोळा आहे. आपल्या दिर्घिकेमध्ये सूर्य हा सर्वात छोटा तारा आहे. सूर्यापेक्षाही खुप मोठे – मोठे तारे अस्तित्वात आहेत.



       सुर्यानंतर, सुर्याच्या सर्वात जवळचा ग्रह बुध (Mercury) ग्रहाविषयी माहिती पाहु. बुध या ग्रहाला सुर्याभोवती एक चक्कर मराण्यासाठी 88 दिवस लागतात म्हणजे बुध ग्रहाचे वर्ष हे 88 दिवसांचेच असते आणि हा कालावधी तीन महिन्यांनपेक्षाही कमी आहे. बुध या ग्रहावरचे जास्तीत जास्त तापमान 4270C तर कमीत कमी तापमान -1730C असते. बुध या ग्रहाचा एक दिवस हा पृथ्वीवरच्या 59 दिवसांइतका असतो. याचाच अर्थ की बुध या ग्रहाला स्वत:भोवती फिरायला 59 दिवस लागतात. बुध या ग्रहाला कोणताही उपग्रह नाही. बुध हा सुर्याच्या सर्वात जवळ असल्यामुळे तिथे सर्वात जास्त तापमान असेल का ? नाही! बुध हा आपल्या सुर्यमालेतील सर्वात उष्ण ग्रह नाही. तर शुक्र हा सुर्य मालेतील सर्वात उष्ण ग्रह आहे. बुध ग्रहावर जीवनमान देखील नाही. बुध हा ग्रह तर आपण उघड्या डोळ्यांनी देखील पाहु शकतो. परंतु फक्त एक तास. तेही सुर्योदयापूर्वी पूर्वेला आणि सूर्यास्तानंतर पश्चिमेला क्षितीजावर.



       समजा पृथ्वीवर तुमचे वजन 100 किलो असेल तर ते बुध ग्रहावर तर फक्त 38 किला भरेल. पृथ्वीवरच्या वजनाच्या 38% वजन तुमचे बुध ग्रहावर भरेल. आतापर्यंत फक्त दोनच अंतराळयान बुध ग्रहावर पाठवण्यात आलेले आहेत. एक मरिनर 10 (mariner 10) आणि मेसेंजर (Messenger). मेसेंजर या अंतराळयानाला तर बुध या ग्रहावर जाण्यासाठी तब्बल साडे सहा वर्षे लागली. आपण जर बुध या ग्रहावर उभा राहून आकाशाकडे पाहिले तर पृथ्वी वरील सूर्यापेक्षा पृथ्वीच्या दुप्पट आकाराचा सुर्य आपल्याला दिसेल. ……….

Wednesday, 26 August 2020

सूर्य (Sun) - 1


       विश्वाच्या पसाऱ्यामध्ये नगण्य असणाऱ्या मनुष्य प्राण्याने विश्वाची कवाडे खुली केली आहेत. ती आपल्या बुद्धीच्या जोरावार. आपण जिथे राहतो ती पृथ्वी आणि या पृथ्वीच्या बाहेरिल विश्वदेखील माणसाने शोधुन काढले आहे.

       सूर्य ते पृथ्वी हे अंतर आहे तब्बल 15 कोटी किलोमीटर आणि अशाच प्रकारे आपण जर किलामीटर मध्ये अंतर मोजले तर आपल्याला आकडे लिहिण्यास कमी पडतील. त्यामुळे या अंतरासाठी वेगळे परिमाण वापरले जाते ते म्हणजे प्रकाशवर्ष. एक प्रकाशवर्ष म्हणजे प्रकाशाने एका वर्षात कापलेले एकुण अंतर होय. प्रकाश एका सेकंदात 3 लाख किलामीटर प्रवास करतो तर मग एका वर्षात प्रकाश किती किलोमीटर अंतर कापेल याची कल्पना देखील आपण करु शकत नाही.

       सूर्य हा जसा आपल्या सूर्यमालेतील एक तारा आहे तसेच अब्जावधी ताऱ्यांच्या समुहाला दिर्घिका म्हणतात. आपली आकाशगंगा ही एक अशीच दिर्घिका आहे. आपल्या दिर्घिकेच्या एका टोकापासुन दुसऱ्या टोकापर्यंत पोहचायला एक लाख वर्षे लागतील. इतकी मोठी आकाशगंगा आहे आपली.

       कोणत्याही वस्तुवर प्रकाश पडल्यानंतर तो प्रकाश परावर्तीत होऊन आपल्या दृष्टीपटलावर पडल्यायनंतर ती वस्तु आपल्याला दिसते. अशा प्रकारे सुर्याची किरणे पृथ्वी पर्यंत पोहचायला 8 मिनिटे 25 सेकंद लागतात म्हणजेच आपण  8.25 मिनिटांपूर्वीचा सूर्य पाहत असतो. अशीच आपली सर्वांत जवळची दिर्घिका “ देवयानी “ ही आपल्या आकाशगंगे पासुन 22 लाख प्रकाश वर्षे दुर आहे. मग या दिर्घिकेला पाहण्यासाठी किती वेळ लागेल बरं ? तब्बल 22 लाख वर्षे ! म्हणजेच आपण जर आत्ता पाहिली तर ती दिर्घिका 22 वर्षांपुर्वीची असेल.

       दिर्घिका म्हणजेच असंख्य ताऱ्यांचा समुह. त्यातीलच एक तारा म्हणजे आपला सुर्य होय. सुर्य हा एक वायुचा गोळा आहे. सुर्यावर हायड्रोजन बॉम्बच्या रुपाने सतत उर्जानिर्मितीचे काम चालु असते. यामुळे सुर्यावर काही ठिकाणी तापमान जास्त असते तर काही ठिकाणी कमी. ज्या ठिकाणी कमी तापमान असते तेथील भाग हे काळ्यारंगाचे दिसतात त्यालाच आपन सौर डाग असे म्हणतो. ( sun spots )……………




चंद्र (Moon)

  चंद्र (Moon)      पृथ्वीवरुन रात्रीच्या आकाशात उघड्या डोळ्यांनी पाहता येणारी खगोलीय वस्तु म्हणजेच चंद्र होय. चंद्र हा आपल्याला रात्रीच्या ...