आज
आपण मंगळ (Mars) या ग्रहाविषयी माहिती पाहुया. मंगळ ग्रहाचे अंतर सुर्यापासुन सुमारे
22.8 कोटी किलोमीटर आहे. सुर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला मंगळ ग्रहाला 1.88 वर्षे
लागतात. या ग्रहावर आयर्न ऑक्साइड मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे हा ग्रहा आपल्याला
तांबुस रंगाचा दिसतो. त्यामुळे या ग्रहाला लाल ग्रह (Red Planet) देखील म्हणतात. मंगळ
ग्रहाला दोन उपग्रह आहेत. एक फोबोस तर दुसरा डिमोस. फोबोसचा व्यास आहे 22.2 किमी तर
डिमोसचा व्यास आहे 12.6 किमी. पृथ्वीला ज्याप्रमाणे सुर्याभोवती फिरण्यासाठी 365 दिवस
लागतात. त्याचप्रमाणे मंगळ ग्रहाला सुर्याभोवती एक फरी पुर्ण करण्यासाठी 687 दिवस लागतात.
पृथ्वीचे
वस्तुमान हे मंगळ ग्रहाच्या सहा पट जास्त आहे. म्हणजेच आपल्या एका पृथ्वीमध्ये सहा
मंगळ ग्रह बसतील. मंगळ ग्रहावर आपण पृथ्वीवर अनुभवत असलेल्या गुरूत्वाकर्षण शक्ती पेक्षा
62.5 % कमी गुरूत्वाकर्षण शक्ती अनुभवयास मिळते. म्हणजे मंगळ ग्रहावर पृथ्वीच्या तुलनेत
37.5% गुरूत्वाकर्षण शक्ती आहे. यामुळे आपण मंगळ ग्रहावर मारलेली उडी पृथ्वीवर मारलेल्या
उडीच्या तुलनेत 3 पट जास्त असेल. मंगळ ग्रहावर असणाऱ्या वातावरणात तब्बल 96% प्रमाण
हे कार्बनडायऑक्साइड चे आहे.
आतापर्यंत
मंगळ ग्रहासाठी 39 योजना आखण्यात आल्या आहेत. परंतु त्यापैकी फक्त 16 च यशस्वी झाल्या
आहेत. त्यातीलच भारताचे मिशन मंगळ हे एक आहे. 5 नोव्हेंबर 2013 रोजी आंध्रप्रदेश राज्यातील
श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातुन प्रक्षेपीत करण्यात आले. सुमारे 25 दिवस
हे यान पृथ्वीच्या कक्षेत स्थिरावले त्यानंतर 30 नोव्हेंबरला हे यान पृथ्वीच्या कक्षेच्या
बाहेर पडले. 24 सप्टेंबर 2014 ला हे यान मंगळाच्या कक्षेत स्थिरावले.
India's mission Mangal |
No comments:
Post a Comment