Tuesday, 3 August 2021

प्लूटो (Pluto)

 

प्लूटो (Pluto)

      आपल्या सूर्यमालेतील सर्वांत शेवटचा ग्रह म्हणजेच प्लूटो ग्रह. या ग्रहाला सूर्यापासून शेवटचा ग्रह म्हणून ओळखले जाते. परंतु आता तो बटु ग्रह म्हणून ओळखला जातो. 2006 मध्ये प्लूटो ग्रहाला बटु ग्रह म्हणून घोषित करण्यात आला. कारण की प्लूटो या ग्रहाची कक्षा नेपच्यूनच्या कक्षेला छेद देऊन जातो. इतर ग्रह मात्र आपआपल्या कक्षेत ‍फिरतात. यामुळे प्लूटोचे ग्रहपद आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघटनेने काढून टाकले.

      अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ Percival Lowell यांनी प्रथम 1905 मध्ये युरेनस आणि नेपच्यून या ग्रहांमध्ये काही हलचाल पाहिली आणि 1915 मध्ये तेथे ग्रह असण्याचे भाकित केले. परंतु त्यानंतर त्यांचा मृत्यु झाला. त्यानंतर 1930 साली Clyde Tombaugh यांनी Lowell आणि आणखी काही खगोल शास्त्रज्ञांच्या भाकितावरून प्लूटो ग्रहाचा शोध लावला.

      प्लूटो ग्रहाचे सूर्यापासूनचे सरासरी अंतर हे 5,906,380,000 km इतके आहे. हे अंतर पृथ्वीच्या 39.482 पट आहे. या ग्रहाचा व्यास हा 2370 km इतका आहे. प्लूटो ग्रहाला स्वता भोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी सहा दिवस लागतात तर सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी तब्बल 248 वर्षे लागतात. म्हणजेच काय तर प्लूटो या ग्रहावरील एक वर्ष म्हणजे आपल्या पृथ्वीवरील 248 वर्षे होय.

      प्लूटो या ग्रहावर नायट्रोजन(N2), मिथेन(CH4), कार्बन मोनॉक्साईड(CO) इत्यादी वायु आढळतात. याग्रहाचा 70% भाग हा खडकापासुन बनलेला असून याग्रहावर 2 ते 3 km उंचीचे डोंगर, पर्वत आढतात. हे पर्वत काही वेळा गोठलेल्या मिथेन वायुन झाकलेले दिसतात. येथील तापमान हे -226°c ते -240°c इतके कमी आहे. शेरॉन(Charon), स्टीक्स(Styx), निक्स(Nix), कर्बेरॉस(Kerberos), हायड्रा(Hydra) इत्यादी पाच उपग्रह आहेत. या मधील शेरॉन हा सर्वात मोठा उपग्रह आहे. जुलै 2015 मध्ये नासा या संस्थेच्या न्यू हॉरिझन या अवकाशयानाने प्लूटो या ग्रहाला भेट दिली. 2006 साली हे यान सोडण्यात आले होते.

No comments:

Post a Comment

चंद्र (Moon)

  चंद्र (Moon)      पृथ्वीवरुन रात्रीच्या आकाशात उघड्या डोळ्यांनी पाहता येणारी खगोलीय वस्तु म्हणजेच चंद्र होय. चंद्र हा आपल्याला रात्रीच्या ...