Monday, 30 November 2020

गुरू (Jupiter)

……. चला तर आज आपण गुरू (Jupiter) ग्रहाविषयी माहिती पाहुया. गुरु ग्रहाचे सुर्यापासुनचे अंतर आहे तब्बल 778 लाख किलोमीटर. हा ग्रह सुर्याभोवती फिरताना एका तासाला 47,051 किमी अंतर पार करतो आणि स्वत:भोवती मात्र 9 तास 56 मिनिटांतच एक फेरी पुर्ण करतो. म्हणजेच गुरू ग्रहावरील एक दिवस हा केवळ 10 तासांचाच असतो. अशा या सर्वात वेगात फिरणाऱ्या ग्रहाला 79 नैसर्गिक उपग्रह लाभले आहेत. गुरू या ग्रहाचे वर्ष हे पृथ्वीवरील 4333 दिवसांचे असते. म्हणजेच 11 वर्षे. यामुळे गुरू ग्रहावर आपला वाढदिवस 11 वर्षांनी आला असता. 
                                          
        गुरू ग्रहाचे वस्तुमान हे सर्व ग्रहामध्ये जास्त आहे. गुरू हा ग्रह पृथ्वीच्या 318 पट मोठा आहे. ज्यामध्ये जवळपास 1300 पृथ्वी बसतील. आपल्या सूर्यमालेतील गुरू ग्रह वगळता सर्व ग्रहांच्या वस्तुमानाच्या बेरजेची दुप्पट केल्यास गुरू या ग्रहाच्या वस्तुमानाच्या बरोबर वस्तुमान होईल. गॅनीमेड हा गुरू या ग्रहाचा सर्वात मोठा उपग्रह आहे. त्याचा शोध इ.स. 1610 मध्ये खगोलशास्त्रज्ञ गॅलीलिओ गॅलेली यांनी शोध लावला. गॅनीमेड हा उपग्रह बुध ग्रहापेक्षा देखील मोठा आहे.

                                     


         गुरू या ग्रहाची चुंबकीय शक्ती देखील खुप जास्त आहे. हे पृथ्वीच्या चुबंकीय शक्ती पेक्षा 20 पट जास्त आहे. गुरू या ग्रहावर फक्त हेलियम आणि हायड्रोजन हे दोनच वायु आढळतात. यापासुनच हा ग्रह बनलेला आहे. थोडक्यात काय तर हा वायुचा गोळा आहे. गुरू या ग्रहावर तांबड्या रंगाचा जो डाग दिसतो ते तेथील एक वादळ आहे. या वादळातील केंद्रामधील वारे हे शांत असतात. परंतु बाहेरील बाजुच्या वाऱ्यांचा वेग हा 430 ते 680 किमी प्रती तास इतका असतो. पृथ्वीवरील सर्वांत जास्त वेगवान वादळाच्या दुपटी पेक्षाही हा वेग जास्त आहे. 2004 च्या सुरूवातीस या वादळाची रुंदी पृथ्वीच्या व्यासाच्या (Diameter) तीन पट जास्त म्हणजेच जवळपास 40,000 किमी इतकी होती. 
                                
                         


        गुरू या ग्रहावरील सरासरी तापमान हे -145˚c आहे. आतापर्यंत गुरू या ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी 9 उपग्रह पाठवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे सर्व उपग्रह नासा या अमेरिकेच्या संस्थेने पाठविलेली आहेत. त्यापैकी सर्वात पहिले पायोनिर - 10 हे होते. ते 3 मार्च 1972 साली पाठवण्यात आले. सर्वात आलीकडील उपग्रह हे Juno हे आहे. ते 5 ऑगस्ट 2011 रोजी पाठवण्यात आले. 5 जुलै 2016 रोजी या उपग्रहाने गुरूच्या कक्षेत प्रवेश केला. ……
                                        
                                   

                                     

1 comment:

चंद्र (Moon)

  चंद्र (Moon)      पृथ्वीवरुन रात्रीच्या आकाशात उघड्या डोळ्यांनी पाहता येणारी खगोलीय वस्तु म्हणजेच चंद्र होय. चंद्र हा आपल्याला रात्रीच्या ...