चंद्र (Moon)
पृथ्वीवरुन रात्रीच्या आकाशात उघड्या डोळ्यांनी पाहता येणारी खगोलीय वस्तु म्हणजेच चंद्र होय. चंद्र हा आपल्याला रात्रीच्या अंधारात दिसतो खरा पण चंद्राला स्वताचा प्रकाश नाही. सुर्याकडुन मिळणारा प्रकाश चंद्र पृथ्वीकडे परावर्तित करतो, त्यामुळे चंद्र आपल्याला प्रकाशमान दिसतो. चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे. चंद्र हा प्लूटो ग्रहापेक्षा देखिल मोठा आहे. चंद्रावर वातावरण देखिल आढळते. तेथील तापमानात प्रचंड बदल झालेले आढळतात. चंद्राच्या सूर्याकडील बाजुचे तापमान हे दिवसा 134°c तर रात्रीच्या वेळी -153°c इतके थंड असते. चंद्राला पृथ्वीभोवती फिरण्यासाठी 27.3 दिवस लागतात.
चंद्राचे पृथ्वीपासुन सरासरी अंतर हे 3,84,400
किमी इतके आहे. चंद्राचे पृथ्वीपासून सर्वात जवळचे अंतर 3,63,300 किमी तर सर्वात दूरचे
अंतर 4,05,500 किमी इतके आहे. चंद्राची गुरुत्वाकर्षन शक्ती पृथ्वीला आपल्याकडे खेचते
त्यामुळेच पृथ्वीवरील समुद्र पातळीत वाढ होते. म्हणजेच भरती ओहोटी येते. चंद्र त्याच्या
गुरूत्वाकर्षण शक्तीने पृथ्वीला आपल्या कडे खेचतो त्याचा हा प्रभाव आहे. तसेच यामुळे
पृथ्वीवरील दिवसात दर 100 वर्षांनी 2.3 मिली सेकंदानी वाढ होते.
चंद्राच्या संबंधीत दोन महत्वाच्या घटना म्हणजे अमावस्या आणि पौर्णिमा.
अमावस्या
अमावस्येला सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र येतो परंतु हे तिघे एका रेषेत नसतात. सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतो परंतु तिथून परावर्तित झालेला प्रकाश हा पृथ्वीवरील अंधाऱ्या भागात पोहचत नाही. परिणामी रात्रीच्या वेळी आकाशात पूर्ण अंधार असतो.
You doing a great job
ReplyDelete