………… आज आपण शनी (Saturn)
या ग्रहाविषयी माहिती पाहुया. हा ग्रह आपल्या सूर्यमालेतील सहाव्या क्रमांकाचा ग्रह
आहे, आणि दुसरा सर्वांत मोठा ग्रह आहे. हा ग्रह सर्वप्रथम इटालियन शास्त्रज्ञ गॅलिलीओ
यांनी 1610 मध्ये आपल्या दुर्बिणीच्या माध्यमातुन पाहिला. शनी हा ग्रह हायड्रोजन आणि
हेलियम या वायुंपासुन बनलेला आहे. या ग्रहाचे वस्तुमान (mass) हे पृथ्वीच्या वस्तुमानाच्या 95 पट आहे.
शनी या ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर हे 143 कोटी
किलोमीटर इतके आहे. शनी हा ग्रह आपल्याला उघड्या डोळ्यांनी देखील दिसतो. परंतु त्याची
कडा, वलय (ring) पाहण्यासाठी मात्र आपल्याला दुर्बिणीची आवश्यकता भासते. शनी या ग्रहाला
सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी तब्बल 29 वर्षे लागतात. पृथ्वीवरील वर्ष हे
365 दिवसांचे असते तर शनी ग्रहावरचे वर्ष 10,759 दिवसांचे असते. शनी ग्रहावरील दिवस
10 तासा 39 मिनिटांचा असतो.
शनी या ग्रहावर वाऱ्यांचा वेग हा 1800 किलोमिटर
प्रती तास इतका असतो. शनी ग्रहाची घनता ही पृथ्वीवरील पाण्याच्या घनतेपेक्षा कमी असल्यामुळे
हा ग्रह जर पाण्यात टाकला तर तो पाण्यावर तरंगेल अर्थातच हे शक्य नाही परंतु कल्पणा
करुन पहा. अशाच प्रकारे आपल्याला जर गाडीने (car) 117 किलोमिटर प्रती तास वेगाने जायचे
असेल तर आपल्याला 1292 वर्षे लागतील.
शनी ग्रहावरील वातावरणाचा दाब हा पृथ्वीवरील
वातावरणाच्या दाबाच्या 100 पट अधिक आहे. शनी ग्रहाला सर्वप्रथम पायोनिअर 11 हे अंतराळयान
1993 साली सोडण्यात आले. त्यानंतर व्हॅायोजर 1 आणि 2 सोडण्यात आले. त्यानंतर 1997 साली
कॅसीनी हे यान सोडन्यात आले आणि 2004 मध्ये ते शनी ग्रहाच्या कक्षेत पोहोचले.
Khup chhan
ReplyDelete