विश्वाच्या पसाऱ्यामध्ये नगण्य असणाऱ्या मनुष्य
प्राण्याने विश्वाची कवाडे खुली केली आहेत. ती आपल्या बुद्धीच्या जोरावार. आपण जिथे
राहतो ती पृथ्वी आणि या पृथ्वीच्या बाहेरिल विश्वदेखील माणसाने शोधुन काढले आहे.
सूर्य ते पृथ्वी हे अंतर आहे तब्बल 15 कोटी किलोमीटर आणि अशाच प्रकारे आपण जर किलामीटर मध्ये अंतर मोजले तर आपल्याला आकडे लिहिण्यास कमी पडतील. त्यामुळे या अंतरासाठी वेगळे परिमाण वापरले जाते ते म्हणजे प्रकाशवर्ष. एक प्रकाशवर्ष म्हणजे प्रकाशाने एका वर्षात कापलेले एकुण अंतर होय. प्रकाश एका सेकंदात 3 लाख किलामीटर प्रवास करतो तर मग एका वर्षात प्रकाश किती किलोमीटर अंतर कापेल याची कल्पना देखील आपण करु शकत नाही.
सूर्य
हा जसा आपल्या सूर्यमालेतील एक तारा आहे तसेच अब्जावधी ताऱ्यांच्या समुहाला दिर्घिका
म्हणतात. आपली आकाशगंगा ही एक अशीच दिर्घिका आहे. आपल्या दिर्घिकेच्या एका टोकापासुन
दुसऱ्या टोकापर्यंत पोहचायला एक लाख वर्षे लागतील. इतकी मोठी आकाशगंगा आहे आपली.
कोणत्याही वस्तुवर प्रकाश पडल्यानंतर तो प्रकाश
परावर्तीत होऊन आपल्या दृष्टीपटलावर पडल्यायनंतर ती वस्तु आपल्याला दिसते. अशा प्रकारे
सुर्याची किरणे पृथ्वी पर्यंत पोहचायला 8 मिनिटे 25 सेकंद लागतात म्हणजेच आपण 8.25 मिनिटांपूर्वीचा सूर्य पाहत असतो. अशीच आपली
सर्वांत जवळची दिर्घिका “ देवयानी “ ही आपल्या आकाशगंगे पासुन 22 लाख प्रकाश वर्षे
दुर आहे. मग या दिर्घिकेला पाहण्यासाठी किती वेळ लागेल बरं ? तब्बल 22 लाख वर्षे !
म्हणजेच आपण जर आत्ता पाहिली तर ती दिर्घिका 22 वर्षांपुर्वीची असेल.
दिर्घिका म्हणजेच असंख्य ताऱ्यांचा समुह. त्यातीलच
एक तारा म्हणजे आपला सुर्य होय. सुर्य हा एक वायुचा गोळा आहे. सुर्यावर हायड्रोजन बॉम्बच्या
रुपाने सतत उर्जानिर्मितीचे काम चालु असते. यामुळे सुर्यावर काही ठिकाणी तापमान जास्त
असते तर काही ठिकाणी कमी. ज्या ठिकाणी कमी तापमान असते तेथील भाग हे काळ्यारंगाचे दिसतात
त्यालाच आपन सौर डाग असे म्हणतो. ( sun spots )……………
Good information
ReplyDeleteNice
ReplyDelete