Saturday, 29 August 2020

सूर्य (Sun) - 2

 


       …………आत्मनिर्भर असलेला हा सूर्य आपल्या पृथ्वी पेक्षा 109 पटीने मोठा आहे. अशा या अवाढव्य सूर्याचे वजन देखील तसेच आहे. सूर्याचे वजन हे  आपल्या सूर्यमालेच्या वजनापैकी सुमारे 99.86 % वजन एकट्या सूर्याचे आहे आणि उरलेला 0.14 % हे सर्व ग्रहांचे. असा हा सूर्य फिरत असेल का ? तर या मध्ये शंका आहे. कारण सूर्य हा वायुपासुन बनलेला गोळा आहे. आपल्या दिर्घिकेमध्ये सूर्य हा सर्वात छोटा तारा आहे. सूर्यापेक्षाही खुप मोठे – मोठे तारे अस्तित्वात आहेत.



       सुर्यानंतर, सुर्याच्या सर्वात जवळचा ग्रह बुध (Mercury) ग्रहाविषयी माहिती पाहु. बुध या ग्रहाला सुर्याभोवती एक चक्कर मराण्यासाठी 88 दिवस लागतात म्हणजे बुध ग्रहाचे वर्ष हे 88 दिवसांचेच असते आणि हा कालावधी तीन महिन्यांनपेक्षाही कमी आहे. बुध या ग्रहावरचे जास्तीत जास्त तापमान 4270C तर कमीत कमी तापमान -1730C असते. बुध या ग्रहाचा एक दिवस हा पृथ्वीवरच्या 59 दिवसांइतका असतो. याचाच अर्थ की बुध या ग्रहाला स्वत:भोवती फिरायला 59 दिवस लागतात. बुध या ग्रहाला कोणताही उपग्रह नाही. बुध हा सुर्याच्या सर्वात जवळ असल्यामुळे तिथे सर्वात जास्त तापमान असेल का ? नाही! बुध हा आपल्या सुर्यमालेतील सर्वात उष्ण ग्रह नाही. तर शुक्र हा सुर्य मालेतील सर्वात उष्ण ग्रह आहे. बुध ग्रहावर जीवनमान देखील नाही. बुध हा ग्रह तर आपण उघड्या डोळ्यांनी देखील पाहु शकतो. परंतु फक्त एक तास. तेही सुर्योदयापूर्वी पूर्वेला आणि सूर्यास्तानंतर पश्चिमेला क्षितीजावर.



       समजा पृथ्वीवर तुमचे वजन 100 किलो असेल तर ते बुध ग्रहावर तर फक्त 38 किला भरेल. पृथ्वीवरच्या वजनाच्या 38% वजन तुमचे बुध ग्रहावर भरेल. आतापर्यंत फक्त दोनच अंतराळयान बुध ग्रहावर पाठवण्यात आलेले आहेत. एक मरिनर 10 (mariner 10) आणि मेसेंजर (Messenger). मेसेंजर या अंतराळयानाला तर बुध या ग्रहावर जाण्यासाठी तब्बल साडे सहा वर्षे लागली. आपण जर बुध या ग्रहावर उभा राहून आकाशाकडे पाहिले तर पृथ्वी वरील सूर्यापेक्षा पृथ्वीच्या दुप्पट आकाराचा सुर्य आपल्याला दिसेल. ……….

No comments:

Post a Comment

चंद्र (Moon)

  चंद्र (Moon)      पृथ्वीवरुन रात्रीच्या आकाशात उघड्या डोळ्यांनी पाहता येणारी खगोलीय वस्तु म्हणजेच चंद्र होय. चंद्र हा आपल्याला रात्रीच्या ...