Skip to main content

Posts

पृथ्वी (Earth)

  ………..चला तर आज आपण आपल्या वस्तीस्थानाविषयी म्हणजेच आपल्या पृथ्वीविषयी माहिती घेऊया. सुर्यापासुन तिसऱ्या स्थानावर असणाऱ्या या ग्रहाचे सुर्यापासुनचे अंतर आहे 15 कोटी किलोमीटर ‼‼ आतापर्यंत तरी फक्त एवढ्याच ग्रहावर आपल्याला सजिवांचे अस्तित्व दिसुन येते.        सुर्याभोवती एक फेरी पुर्ण करण्यासाठी पृथ्वीला 365 दिवस लागतात आणि स्वत:भोवती फिरण्यासाठी 24 तास लागतात. सूर्याभोवती फिरतांना पृथ्वी एका सेकंदात 30 किलोमीटर अंतर पार करते. म्हणजेच एका तासाला 1,08,000 किमी प्रवास करते. आपल्या पृथ्वीला एकच उपग्रह चंद्राच्या रुपाने भेटला आहे. अशी ही आपली पृथ्वी असा एकमेव ग्रह आहे की ज्याला देवाच्या नावावरुन नाव दिलेले नाही. आपला ग्रह हा 70% पाण्याने व्यापलेला आहे व उर्वरित जमिन आहे. पृथ्वीवर 3% पाणीच पिण्यायोग्य आहे. त्यातले 2% हे हिमनद्यामध्ये बर्फाच्या स्वरुपात आहे. उरलेला 1% हे पाणी पिण्यासाठी नद्या, तळे, धरणे यांमध्ये साठवले जाते. अशा या पृथ्वीभोवती सद्यस्थितीला 2,666 उपग्रह (satellite) कार्यरत आहेत.

शुक्र (Venus)

  विश्व पसारा भाग : 3                                                 … ……… चला तर आता ग्रहमालेतील दुसऱ्या ग्रहाविषयी माहिती घेऊ; म्हणजेच  शुक्र (Venus) ग्रहाविषयी.  शुक्र हा ग्रह जरी सुर्यापासुन दुसऱ्या नंबरवर असला तरी तो सर्वात उष्ण ग्रह  आहे. शुक्र या ग्रहाबाबत मजेदार गोष्ट म्हणजे या ग्रहावर वर्षापेक्षा दिवस मोठा आहे. आपल्याला हे ऐकायला जरा विचित्रच वाटेल परंतु हे खरे आहे. शुक्र या ग्रहाला स्वत:भोवती चक्कर  मारण्यास 244 दिवस लागतात तर शुक्र या ग्रहाला सुर्याभोवती एक पुर्ण चक्कर मारण्यासाठी 225 दिवस लागतात. शुक्र ग्रहावरील दिवस हा पृथ्वीवरील 244 दिवसांइतका असतो तर वर्ष हे पृथ्वीवरील 225 दिवसांइतके असते. बुध ग्रहाप्रमाणेच या ग्रहाला पण उपग्रह नाही.      शुक्र या ग्रहावर पाऊस पडतो पण तो सल्फ्युरिक ॲसिडचा. शुक्रावरील वातावरणात कार्बनडायऑक्साइडचे प्रमाण 98% तर नायट्रोजन, अरगॉन, कार्बन मोनॉक्साईड या सर्व वायुंचे प्रमाण 2% आ...

सूर्य (Sun) - 2

         …………आत्मनिर्भर असलेला हा सूर्य आपल्या पृथ्वी पेक्षा 109 पटीने मोठा आहे. अशा या अवाढव्य सूर्याचे वजन देखील तसेच आहे. सूर्याचे वजन हे  आपल्या सूर्यमालेच्या वजनापैकी सुमारे 99.86 % वजन एकट्या सूर्याचे आहे आणि उरलेला 0.14 % हे सर्व ग्रहांचे. असा हा सूर्य फिरत असेल का ? तर या मध्ये शंका आहे. कारण सूर्य हा वायुपासुन बनलेला गोळा आहे. आपल्या दिर्घिकेमध्ये सूर्य हा सर्वात छोटा तारा आहे. सूर्यापेक्षाही खुप मोठे – मोठे तारे अस्तित्वात आहेत.        सुर्यानंतर, सुर्याच्या सर्वात जवळचा ग्रह बुध (Mercury) ग्रहाविषयी माहिती पाहु. बुध या ग्रहाला सुर्याभोवती एक चक्कर मराण्यासाठी 88 दिवस लागतात म्हणजे बुध ग्रहाचे वर्ष हे 88 दिवसांचेच असते आणि हा कालावधी तीन महिन्यांनपेक्षाही कमी आहे. बुध या ग्रहावरचे जास्तीत जास्त तापमान 427 0 C तर कमीत कमी तापमान -173 0 C असते. बुध या ग्रहाचा एक दिवस हा पृथ्वीवरच्या 59 दिवसांइतका असतो. याचाच अर्थ की बुध या ग्रहाला स्वत:भोवती फिरायल...

सूर्य (Sun) - 1

       विश्वाच्या पसाऱ्यामध्ये नगण्य असणाऱ्या मनुष्य प्राण्याने विश्वाची कवाडे खुली केली आहेत. ती आपल्या बुद्धीच्या जोरावार. आपण जिथे राहतो ती पृथ्वी आणि या पृथ्वीच्या बाहेरिल विश्वदेखील माणसाने शोधुन काढले आहे.        सूर्य ते पृथ्वी हे अंतर आहे तब्बल 15 कोटी किलोमीटर आणि अशाच प्रकारे आपण जर किलामीटर मध्ये अंतर मोजले तर आपल्याला आकडे लिहिण्यास कमी पडतील. त्यामुळे या अंतरासाठी वेगळे परिमाण वापरले जाते ते म्हणजे प्रकाशवर्ष. एक प्रकाशवर्ष म्हणजे प्रकाशाने एका वर्षात कापलेले एकुण अंतर होय. प्रकाश एका सेकंदात 3 लाख किलामीटर प्रवास करतो तर मग एका वर्षात प्रकाश किती किलोमीटर अंतर कापेल याची कल्पना देखील आपण करु शकत नाही.        सूर्य हा जसा आपल्या सूर्यमालेतील एक तारा आहे तसेच अब्जावधी ताऱ्यांच्या समुहाला दिर्घिका म्हणतात. आपली आकाशगंगा ही एक अशीच दिर्घिका आहे. आपल्या दिर्घिकेच्या एका टोकापासुन दुसऱ्या टोकापर्यंत पोहचायला एक लाख वर्षे लागतील. इतकी मोठी आकाशगंगा आहे आपली.      ...