……. चला तर आज आपण गुरू (Jupiter) ग्रहाविषयी माहिती पाहुया. गुरु ग्रहाचे सुर्यापासुनचे अंतर आहे तब्बल 778 लाख किलोमीटर. हा ग्रह सुर्याभोवती फिरताना एका तासाला 47,051 किमी अंतर पार करतो आणि स्वत:भोवती मात्र 9 तास 56 मिनिटांतच एक फेरी पुर्ण करतो. म्हणजेच गुरू ग्रहावरील एक दिवस हा केवळ 10 तासांचाच असतो. अशा या सर्वात वेगात फिरणाऱ्या ग्रहाला 79 नैसर्गिक उपग्रह लाभले आहेत. गुरू या ग्रहाचे वर्ष हे पृथ्वीवरील 4333 दिवसांचे असते. म्हणजेच 11 वर्षे. यामुळे गुरू ग्रहावर आपला वाढदिवस 11 वर्षांनी आला असता. गुरू ग्रहाचे वस्तुमान हे सर्व ग्रहामध्ये जास्त आहे. गुरू हा ग्रह पृथ्वीच्या 318 पट मोठा आहे. ज्यामध्ये जवळपास 1300 पृथ्वी बसतील. आपल्या सूर्यमालेतील गुरू ग्रह वगळता सर्व ग्रहांच्या वस्तुमानाच्या बेरजेची दुप्पट केल्यास गुरू या ग्रहाच्या वस्तुमानाच्या बरोबर वस्तुमान होईल. गॅनीमेड हा गुरू या ग्रहाचा स...