Skip to main content

Posts

Showing posts from August, 2020

सूर्य (Sun) - 2

         …………आत्मनिर्भर असलेला हा सूर्य आपल्या पृथ्वी पेक्षा 109 पटीने मोठा आहे. अशा या अवाढव्य सूर्याचे वजन देखील तसेच आहे. सूर्याचे वजन हे  आपल्या सूर्यमालेच्या वजनापैकी सुमारे 99.86 % वजन एकट्या सूर्याचे आहे आणि उरलेला 0.14 % हे सर्व ग्रहांचे. असा हा सूर्य फिरत असेल का ? तर या मध्ये शंका आहे. कारण सूर्य हा वायुपासुन बनलेला गोळा आहे. आपल्या दिर्घिकेमध्ये सूर्य हा सर्वात छोटा तारा आहे. सूर्यापेक्षाही खुप मोठे – मोठे तारे अस्तित्वात आहेत.        सुर्यानंतर, सुर्याच्या सर्वात जवळचा ग्रह बुध (Mercury) ग्रहाविषयी माहिती पाहु. बुध या ग्रहाला सुर्याभोवती एक चक्कर मराण्यासाठी 88 दिवस लागतात म्हणजे बुध ग्रहाचे वर्ष हे 88 दिवसांचेच असते आणि हा कालावधी तीन महिन्यांनपेक्षाही कमी आहे. बुध या ग्रहावरचे जास्तीत जास्त तापमान 427 0 C तर कमीत कमी तापमान -173 0 C असते. बुध या ग्रहाचा एक दिवस हा पृथ्वीवरच्या 59 दिवसांइतका असतो. याचाच अर्थ की बुध या ग्रहाला स्वत:भोवती फिरायल...

सूर्य (Sun) - 1

       विश्वाच्या पसाऱ्यामध्ये नगण्य असणाऱ्या मनुष्य प्राण्याने विश्वाची कवाडे खुली केली आहेत. ती आपल्या बुद्धीच्या जोरावार. आपण जिथे राहतो ती पृथ्वी आणि या पृथ्वीच्या बाहेरिल विश्वदेखील माणसाने शोधुन काढले आहे.        सूर्य ते पृथ्वी हे अंतर आहे तब्बल 15 कोटी किलोमीटर आणि अशाच प्रकारे आपण जर किलामीटर मध्ये अंतर मोजले तर आपल्याला आकडे लिहिण्यास कमी पडतील. त्यामुळे या अंतरासाठी वेगळे परिमाण वापरले जाते ते म्हणजे प्रकाशवर्ष. एक प्रकाशवर्ष म्हणजे प्रकाशाने एका वर्षात कापलेले एकुण अंतर होय. प्रकाश एका सेकंदात 3 लाख किलामीटर प्रवास करतो तर मग एका वर्षात प्रकाश किती किलोमीटर अंतर कापेल याची कल्पना देखील आपण करु शकत नाही.        सूर्य हा जसा आपल्या सूर्यमालेतील एक तारा आहे तसेच अब्जावधी ताऱ्यांच्या समुहाला दिर्घिका म्हणतात. आपली आकाशगंगा ही एक अशीच दिर्घिका आहे. आपल्या दिर्घिकेच्या एका टोकापासुन दुसऱ्या टोकापर्यंत पोहचायला एक लाख वर्षे लागतील. इतकी मोठी आकाशगंगा आहे आपली.      ...