नेपच्यून (Neptune) आता आपण सुर्यापासून सर्वात दूरच्या ग्रहाची म्हणजेच नेपच्यून या ग्रहाची माहिती पाहुयात. या ग्रहाचे सुर्यापासूनचे अंतर हे 4,498,396,000 किलोमीटर इतके आहे. इतके जास्त अंतर असल्यामुळे नेपच्यून ग्रहाला सुर्याभोवती एक फेरी मारण्यासाठी 164 वर्षे लागतात. तर नेपच्यून वरील दिवस मात्र फक्त 16 तास 7 मिनिटांचा असतो. म्हणजेच स्वत:भोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी त्याला 16 तास 7 मिनिटे इतका वेळ लागतो. अशा या नेपच्यून ग्रहाचे 14 चंद्र ज्ञात आहेत. नेपच्यून हा ग्रह गॅस आणि बर्फाचा गोळा आहे. या ग्रहाची गुरूत्वाकर्षण शक्ती ही पृथ्वीच्या गुरूत्वाकर्षण शक्ती ही पृथ्वीच्या गुरूत्वाकर्षण शक्तीपेक्षा 17% जास्त मजबुत आहे. या ग्रहावरील वाऱ्यांचा वेग हा सरासरी 2100 किलोमीटर प्रति तास इतका आहे. आतापर्यंत फक्त एकाच अंतराळयानाने या ग्रहाला भेट दिली आहे. 25 ऑगस्ट 1989 रोजी Voyager 2 या यानाने ग्रहाच्या उत्तर ध्रुवापासुन 3000 किलोमीटर इतक्या जवळून गेले. नेपच्यून ग्रहाचे वजन ...