विश्व पसारा भाग : 3 … ……… चला तर आता ग्रहमालेतील दुसऱ्या ग्रहाविषयी माहिती घेऊ; म्हणजेच शुक्र (Venus) ग्रहाविषयी. शुक्र हा ग्रह जरी सुर्यापासुन दुसऱ्या नंबरवर असला तरी तो सर्वात उष्ण ग्रह आहे. शुक्र या ग्रहाबाबत मजेदार गोष्ट म्हणजे या ग्रहावर वर्षापेक्षा दिवस मोठा आहे. आपल्याला हे ऐकायला जरा विचित्रच वाटेल परंतु हे खरे आहे. शुक्र या ग्रहाला स्वत:भोवती चक्कर मारण्यास 244 दिवस लागतात तर शुक्र या ग्रहाला सुर्याभोवती एक पुर्ण चक्कर मारण्यासाठी 225 दिवस लागतात. शुक्र ग्रहावरील दिवस हा पृथ्वीवरील 244 दिवसांइतका असतो तर वर्ष हे पृथ्वीवरील 225 दिवसांइतके असते. बुध ग्रहाप्रमाणेच या ग्रहाला पण उपग्रह नाही. शुक्र या ग्रहावर पाऊस पडतो पण तो सल्फ्युरिक ॲसिडचा. शुक्रावरील वातावरणात कार्बनडायऑक्साइडचे प्रमाण 98% तर नायट्रोजन, अरगॉन, कार्बन मोनॉक्साईड या सर्व वायुंचे प्रमाण 2% आ...